Menu

Papaya Benefits in Marathi | पपई फायदे

पपई खा आणि निरोगी राहा

आपण सगळेच नेहमी  फळे खातो. त्यात  चवीला छान, पौष्टिक आणि उपयुक्त असे फळ  म्हणे पपई. अति गुणकारी तत्वे असलेले हे एक फळ आहे.  आज आपण याचे फायदे  पाहूया.

1. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते पपई

जर तुम्हाला कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास पपई जरूर खावा. यात व्हिटामिन सी व फायबर योग्य प्रमाणात असल्याने याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्टेरॉल कमी होते. याने हृदयविकाराचा धोकाही टळतो. हा उष्ण असल्याने शक्यतो  थंड ऋतूत याचे सेवन करावे व उन्हाळ्यात याचे सेवन टाळावे. माफक प्रमाणात हे खाल्ल्यास अपय होणार नाही.याने त्वचाही सुंदर होते.

2. वजन कमी होते

जर तुम्हाला सोप्या मार्गाने वजन कमी करायचे असल्यास पपई नक्की खावा. याने तुमचे वजन नक्की कमी होईल. नियमित तुमच्या आहारात याचा समावेश करा आणि नक्की फरक पाहा. यातील फायबरमुळे नको त्या वेळी लागणारी भूक नियंत्रणात येते आणि वजन घटवण्यात तुमची मदत होते.

3. रोगप्रतिकारशक्ती मध्ये  वाढ होते

पपई खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याने तुम्ही निरनिराळ्या आजारांचा सामना नक्कीच करू शकता. यामुळे शरीराला ‘व्हिटामिन सी’ मिळते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाणही नीट राहते. पपई नियमित खाल्ल्याने तुम्ही नक्कीच निरोगी राहाल.

4. मधुमेहींसाठी गुणकारी

पपई नुसताच गोड असतो पण यात साखरेचे प्रमाण काहीच नसल्याने याने रक्तातील साखर वाढायची भीती कमी होते. म्हणूनच मधुमेही  रुग्ण पपई खाऊ शकतात. प्रत्येक पपईच्या तुकड्यात साखरेचे प्रमाण अत्यल्प म्हणजेच ८.३ ग्राम इतकेच असते आणि म्हणून मधुमेही हे नक्कीच खाऊ शकतात. जर तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह असेल आणि तुम्हाला मधुमेह होण्यापासून स्वतःला वाचवायचे असेल तर प्पैचे सेवन तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे आहे.

5. डोळ्यांसाठी चांगले

पपई नियमित खाल्ल्याने  तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले  राहते. चष्मा लागायला नको असल्यास पपई नक्की खावा. याने दृष्टी चांगली होते.

6. पचन होते

पपई नियमित खाल्ल्याने अन्नाचे पचन  नीट  तर होतेच आणि तुमचे पोट साफ होते. यामुळे तूही स्वतःचा पोटाच्या अनेक विकारांपासून बचाव करू शकता.

7. तणावापासून मुक्ती मिळते

पपईमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते ज्याने तुम्ही तणावापासून दूर राहू शकता. याने थकवा कमी होऊन शरीरात उर्जा
निर्माण होते.

8.मासिक पाळी नियमित होते

जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर नक्कीच पपईचे सेवन तुमच्या फायद्याचे ठरेल. पपई तुमच्या शरीरात हार्मोनचे
संतुलन राखतो आणि तुमची मासिक पाळी नियमित होऊ शकते.

9. त्वचेसाठी चांगले

त्वचेसाठी पपई खूप चांगला. पपईची साल काढून चेहऱ्यावर फिरवल्याने चेहऱ्यावर तकाकी येते.

10. कर्करोगाशी सामना

साधे आजाराच नाही तर कर्करोगासारख्या भयानक रोगांशी सामना करायला पपई तुम्हाला मदत करते. पपईमधील पोषकतत्वे
कर्करोगाशी सामना करतात.

11. केसांना मजबूत बनवते

पपईचा रस काढून नियमितपणे केसांना लावल्यास केस घनदाट व मजबूत होतात.

१२. सांधेदुखीवर गुणकारी

साधेदुखीच्या रुग्णांनी पपईचे सेवन नियमित करावे. यातील विटामिन सी ने तुमच्या सांध्याला मजबुती मिळते व
सांधेदुखीपासून आराम मिळतो.

तर हे आहेत पपई खाल्ल्याने होणारे फायदे. पपई खाऊन पाहा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

पपईचे फळ, पपइचे झाड-papaw, papaya, pawpaw – च्या फायदे

Comments

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *