Varun Dhawan Biography in Marathi | वरुण धवन जीवनचरित्र
वरूण धवन हा चित्रसृष्टीतील एक तरुण व तडफदार अभिनेता आहे. चित्रसृष्टीत बोना फाईड सुपरस्टार अशी त्यांची ख्याती आहे.आज या लेखात आम्ही तुम्हाला वरूण धवनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत जी यापूर्वी तुम्हाला माहिती नसेल. आज घेऊया जाणून त्याच्याबद्दल बरेच काही, विकी वय मैत्रिणी उंची वजन आणि बरेच काही.
माहिती
वरून धवन याचा जन्म २४ एप्रिल १९८७ साली मुंबईत झाला. चित्रसृष्टीतील निर्माते डेविड धवन यांचे ते पुत्र असून पप्पू हे त्याचे टोपणनाव आहे.
त्याने त्याचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटीश मुंबई येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढच्या बिझिनेस मेनेजमेंत शिक्षणाला इंग्लंड येथे सुरुवात केली.
शरीरयष्टी
वरूण दिसायला चांगला आणि तडफदार आहे. त्याची उंची खूप चांगली म्हणजेच अंदाजे पाच फुट नउ इंच आहे आणि वजन अंदाजे ८० किलो इतके आहे. बांधा मध्यम असून छाती ४० इंच तर बहु १५ इंच आहेत. त्याचे डोळे गडद तपकिरी, केस काळे आणि दाढीमिशाही आहेत.तो दिसायला आकर्षक आणि रुबाबदार आहे.
कुटुंब, जात वगैरे
वरूणचा जन्म मुंबईतील एका चित्रसृष्टी संबंधित हिंदू कुटुंबात झाला. सध्या त्याचे वास्तव्य ए १५ , सागर दर्शन कर्तर रोड खर पश्चिम मुंबई २०१ तसेच २०१ २०२ बीच वूड हौस ओबेरॉय एन्क्लेव, जे डब्लू मारीओत जुहू येथे आहे. त्याचे वडील डेविड धवन हे एक चित्रसृष्टीतील दिगदर्शक असून त्याची आई करुणा धवन ही एक गृहिणी आहे. त्याचा एकाच भाऊ ज्याचे नाव रोहित धवन आहे जो एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक असून त्याचे काका अनिल धवन हे एक अभिनेते आहेत.
वरुण हा सध्या अविवाहित आहे पण अमेरिकेत असताना त्याचे सारा नावाच्या मुलीबरोबर नाते होते असे म्हटले जाते.
त्यानंतर तो अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याशी संपर्कात आला पण कालांतराने काही कारणाने त्यांच्यात वाद झाले. आता त्याचे प्रसिद्ध फेशन डिझायनर नताशा दलाल हिच्याशी सुत जुळले आहे.
करियर
चित्रसृष्टीतील पार्श्वभूमी असल्याने वरुणला कायमच सिनेमाचे आकर्षण होते आणि त्याने मोठ्या पडद्यावर यायचे स्वप्न खूप लहान असल्यापासूनच उराशी बाळगले होते. त्याला चित्रसृष्टीत त्याच्या वडिलांनी म्हणजेच डेविड धवन यांनी आणले. अभिनय करण्याआधी त्याने करण जोहर याच्या माय नेम ईस खान या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला २०१२ मध्ये स्टुदंट ऑफ द इयर या चित्रपटापासून सुरुवात केली ज्यासाठी त्याला अवार्ड ही मिळाला.
२०१४ मध्ये त्याचे नाव फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० या यादीत समाविष्ट केले गेले. हे नाव त्याच्या आर्थिक उत्पन्न आणि अवार्डवरून समाविष्ट केले गेले. त्याने जुडवा २, बद्रीनाथ कि दुल्हनिया, मै तेरा हिरो, हम्प्ती शर्मा कि दुल्हनिया, बदलापूर, ABCD२ आणि अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांतून काम केले. त्याच्या उत्कृष्ठ कामाबद्दल त्याला अनेक नामांकने आणि अवार्ड्स मिळाले.
अभिनयाव्यतिरिक्त तो रंगमंचावरही काम करतो आणि त्याने अनेक अवार्ड समारंभांचे सूत्रसंचालनही केले आहे.
वाद
अशी एक अफवा होती कि एका वादानंतर अभिनेता शेळ खान याने वरुणच्या थोबाडीत वाजवली पण ह्या गोष्टीचा दोघांनी इन्कार केला आहे.
सत्य
- त्याच्या शालेय जीवनात तो अनेक कुस्त्या पहायचा आणि तेव्हापासूनच तो मल्ल आणि अभिनेता द्वायेन याचा चाहता बनला. एकदा त्यांच्या चाहत्यांनी रॉक द्वायेनला त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची विनंती केली.
- शाळेत तो एक हुशार विद्यार्थी होता आणि दहावी परीक्षेत त्याने ८२ % गुण मिळवले.
- त्याला सामिष आहार आवडतो , मुख्यकरून चिकन.
- त्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असल्याने तो साखर खाणे टाळतो आणि त्याला मद्यपानही आवडत नाही.
- त्याने अभिनयाच्या पैलूंचे शिक्षण बरी जोन याच्या कार्यशाळेतून घेतले. त्यःच्या बरोबर अभिनेता अर्जुन कपूरही होता. तिथे त्यांनी व्हाईट माउंटन नावाचा लघुपट चित्रित केला.
- त्याचा मेणाचा पुतळा मादाम तुसाद होण्ग्कोंग येथे आहे.
- जवानाची भूमिका करायचे त्याचे स्वप्न आहे.
- त्याचे आवडते कलाकार म्हणजे गोविंदा, द्वायेन जोन्सन, प्रियांका चोप्रा , अंजेलिना जोली आणि प्रीती झिंटा.
- त्याला वेगवेगळे चित्रपट आवडतात जसे कि रंग दे बसंती, गाईड, कागझ के फुल, कुछ कुछ होता हैं, राजा बाबू आणि अमेरिकन चित्रपट अमेरिकन सायको.
- फावल्या वेळात त्याला वाचन नृत्य आणि पोहायला आवडते, तसेच फुटबॉल खेळणेही आवडते.
- दक्षिण आशियातील मालदीव ही त्याची आवडती जागा आहे.